ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन
आरोग्य सुरक्षा कार्ड : कार्ड एक फायदे अनेक
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन (NGO) ही एक नोंदणीकृत संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात आरोग्य क्षेत्रात (Health)भरीव काम केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबीर घेणे शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेचे प्रतिनिधी करत असतात अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी असणाऱ्या शासनाच्या आरोग्य योजना (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना,आयुष्मान भारत) या व इतर योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेचे प्रतिनिधी आरोग्य,आहार,स्वच्छता याबद्दल गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन जनजागृती करत असतात. कुपोषण ही एक गंभीर स्थिती आहे,एखाद्या व्यक्तीला आहारातून पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर त्या व्यक्तीचे कुपोषण होते त्यासाठी योग्य आहार कोणता तसेच कुपोषणाची लक्षणे कोणती याविषयी जनजागृती केली जाते. अपंगत्वाचे प्रकार अपंगत्वाची कारणे,अपंगांसाठी असणाऱ्या शासनाच्या सवलती,अपंग मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी विषयी माहिती देण्याचे काम वेगवेगळ्या शिबिरातून केले जाते.
अधिक वाचाप्रकल्प
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन (NGO) : आमचे इतर प्रकल्प
व्यसनमुक्ती
व्यसनमुक्ती अभियान राबवणे
कुपोषण मुक्ती
कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करणे.
मतिमंद नियंत्रण
मतिमंद व कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम राबवणे.
आरोग्य अभियाने
ग्रामीण भागात रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे.
शिक्षण
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऋग्वेद योग विद्यालय स्थापन करणे.
DTSE
DIAMOND TALENT SEARCH EXAMINATION (DTSE)या नावाने राज्य व जिल्हा स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.
विमा
आरोग्य सुरक्षा कार्ड विमा लवकरच आपल्या सेवेत....
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन चे आरोग्य सुरक्षा कार्ड घेतल्यामुळे माझ्या कुटूंबात अचानक आलेल्या हॉस्पिटल च्या खर्चात मला सूट मिळाली. अतिशय नाजूक काळात मला आरोग्य सुरक्षा कार्ड मुळे आधार मिळाला.
आरोग्य सुरक्षा कार्ड घेतल्यामुळे मला हॉस्पिटल, मेडिकल आणि टेस्टिंग च्या खर्चात सूट मिळाली, त्यामुळे मला खूप सहकार्य झाले, कमी खर्चात चांगले उपचार मिळाले. खूप खूप धन्यवाद!