आरोग्य सुरक्षा कार्ड योजनेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे

व्यक्ती आजारी पडल्यानंतर झटपट रुग्णालयात न जाता आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आजार वाढतो आजाराचे निदान होण्यास वेळ लागतो त्यामुळे उपचारास होणारा खर्च वाढतो. आरोग्य सुरक्षा कार्ड योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन आरोग्याविषयी जनजागृती करणे, शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत अशा ठिकाणी आरोग्य शिबिर घेणे व आरोग्य ही संपत्ती आहे ( Health is Wealth)एक वेळ पैसा संपला तर तो कमवता येईल पण आरोग्य संपलं तर कमवता येत नाही याचे महत्त्व पटवून देण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेचे प्रतिनिधी,संस्थेचे आरोग्य दूध करत असतात गावोगावी वाऱ्या वस्त्यावर ही योजना राबवत असताना योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षा कार्ड दिले जाते. आरोग्य सुरक्षा कार्ड धारकांना तालुक्याच्या ठिकाणचे खाजगी डॉक्टर, लॅब व मेडिकल चालक ही बिलामध्ये सवलत देऊन सामाजिक कार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून डॉक्टर,लॅब व मेडिकल चालक पण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्हाला सहकार्य करत आहेत.

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन (NGO) ही एक नोंदणीकृत संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात आरोग्य क्षेत्रात (Health)भरीव काम केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबीर घेणे शासनाच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेचे प्रतिनिधी करत असतात अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी असणाऱ्या शासनाच्या आरोग्य योजना (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना,आयुष्मान भारत) या व इतर योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेचे प्रतिनिधी आरोग्य,आहार,स्वच्छता याबद्दल गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन जनजागृती करत असतात. कुपोषण ही एक गंभीर स्थिती आहे,एखाद्या व्यक्तीला आहारातून पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर त्या व्यक्तीचे कुपोषण होते त्यासाठी योग्य आहार कोणता तसेच कुपोषणाची लक्षणे कोणती याविषयी जनजागृती केली जाते. अपंगत्वाचे प्रकार अपंगत्वाची कारणे,अपंगांसाठी असणाऱ्या शासनाच्या सवलती,अपंग मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी विषयी माहिती देण्याचे काम वेगवेगळ्या शिबिरातून केले जाते.

आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार, स्वच्छता करमणूक व्यायाम व विश्रांती नोकरी व पर्यावरण या बाबींकडे आपले लक्ष पाहिजे. दैनंदिन जीवनात सकस व संतुलित नियमित पुरेसा व ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य लाभते.व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादी सारखे रोग उद्भवतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो.मानसिक स्वास्थ लाभते, व्यक्ती जेव्हा उदासीन बनतो तेव्हा तो मनोरंजनाचा आधार घेतो. नियमित व सुयोग्य व्यायाम केल्यास निरोगी सुदृढ आरोग्य लाभते,रोगप्रतिकारक शक्ती वाढते, व्यायामाबरोबरच विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे योग्य प्रसंगी चांगल्या प्रकारची विश्रांती घेतल्यास विश्रांतीनंतर व्यक्तीचे शरीर उत्साही बनते व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. कामावरील वातावरण याचा देखील आरोग्यावर परिणाम होतो आनंदी वातावरणात काम केल्याने उत्साह वाढतो व कार्यक्षमता सुद्धा वाढण्यास मदत होते व्यक्तीच्या कौटुंबिक सामाजिक व सांस्कृतिक स्थिती समतोलाची राहू शकेल असे पर्यावरण लाभल्यास आरोग्याचा दर्जा उंचावतो. ज्या देशातील समाज हा निरोगी असतो तो देश प्रगतीच्या शेवटच्या बिंदूवर जाऊन म्हणून, म्हणून या सर्व बाबींसाठी आरोग्य महत्त्वाचे असते. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्व आहे व आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य बिघडल्यावर सुधारत बसण्यापेक्षा आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.

0
0
0
DTSE

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन तर्फे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी यासाठी DIAMOND TALENT SEARCH EXAMINATION (DTSE)या नावाने राज्य व जिल्हा स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना Merit Certificate दिले जाते तसेच टॉपर्स विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

व्यसनमुक्ती

व्यसनमुक्ती अभियान राबवणे

कुपोषण मुक्ती

कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करणे.

मतिमंद नियंत्रण

मतिमंद व कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम राबवणे.

आरोग्य अभियाने

ग्रामीण भागात रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे.

शिक्षण

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऋग्वेद योग विद्यालय स्थापन करणे.

"आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे!"

आपल्या किंवा कुटुंबातील सदस्यांना आरोग्यसंबंधी काही समस्या आल्यास आमच्याशी संपर्क करा.