DTSE
Diamond Talent Search ExamDiamond Talent Search Exam(DTSE)
विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरापासून सर्व विषयांचा चिकित्सकणे अभ्यास करायाची सवय रुजविणे, तसेच इ.५वी व इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परिक्षेची तयारी करून घेणे, भविष्यातील स्पर्धा परिक्षांचा पाया मजबुत करणे व मुलांना सक्षम व धाडसी करणे हा परिक्षा घेण्यामागचा उद्देश आहे. हि परिक्षा स्वयंअध्ययनावर असते. प्रश्नसंच मुलांच्या मराठी, गणित, इंग्रजी या पुस्तकावर आधारित त्यामुळे मुलांचा चालू वर्षाचा अभ्यास होण्यास मदत होते.
परीक्षा पद्धत व शिष्यवृत्ती (SCHOLRSHIP)
- १) मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या इ.१ ली ते इ.८वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (SCHOLRSHIP) परिक्षा घेतली जाते.
- २) भाषा, गणित, इंग्रजी व बुध्दिमत्ता चाचणी या विषयांचे एकत्रीत ५० प्रश्न १०० गुणांसाठी दिले जातात.
- ३) विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रत्येक विषयांचे १०० प्रश्न दिले जातात व त्यातुनच परिक्षेसाठी ५० प्रश्न देऊन १०० गुणांची परिक्षा घेतली जाते.
- ४) यामध्ये तालुक्यातुन मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येक वर्गातून प्रत्येकी ३ व उत्तेजनार्थ २ विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व स्वामी विवेकानंद डायमंड विद्यार्थी स्कॉलरशिप दिली जाते.
- ५) प्रथम क्र. रु.३०००/-, द्वितीय क्रमांक रु.२०००/- व तृतीय क्रमांक रु. १०००/- तसेच उत्तेजनार्थ रु. ५००/- स्कॉलरशिप व ट्रॉफी दिली जाते.
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन तर्फे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी यासाठी DIAMOND TALENT SEARCH EXAMINATION (DTSE)या नावाने राज्य व जिल्हा स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना Merit Certificate दिले जाते तसेच टॉपर्स विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
व्यसनमुक्ती अभियान राबवणे
कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करणे.
मतिमंद व कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम राबवणे.
ग्रामीण भागात रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऋग्वेद योग विद्यालय स्थापन करणे.
"आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे!"
आपल्या किंवा कुटुंबातील सदस्यांना आरोग्यसंबंधी काही समस्या आल्यास आमच्याशी संपर्क करा.